कमलसिंह यादव

प्रतिनिधी

 

पारशिवनी:- तालुक्यातिल आमडी – पारशिवनी रोड वर स्थित नयाकुंड गाव येथे नवरात्रोत्सव उत्सवाच्या निमित्ताने सप्त खंजेरी चे जनक श्री सत्यपाल महाराज यांचे शिष्य आकाशपाल महाराज निस्ताने यांचे जाहीर प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्येक्रम आयोजित करण्यात आला .यावेळी प्रसंगी सप्तखंजेरी वादक आकाशपाल महाराज यांनी आपल्या किर्तनातुन हगणदारी मुक्त गाव,ग्रामस्वच्छता,हुंडाबळी,स्र्ती-भृणहत्या, धर्मा-धर्मातील भेदाभेद, तरुनांचे संघटन अशा अनेक ज्वलत सामाजिक विषयांवर नागरिकांना मार्गदर्शन केले.

तबला वादक कमलेश सहारे, हार्मोनियम वादक शैलेश पाटील,गायन/कोरस आदर्श कोळमकर ,साथसंगत अभिषेक निर्मोही, मयुर कडू, वाहन चालक धिरज चौधरी आदींनी त्यांना साथसंगत केली.

 कार्यक्रम बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.या कार्यक्रमाला बाल दुर्गा उत्सव मंडळ नयाकुंड तसेच गावातील समस्त ग्रामवासी यांनी सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com