संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
दि.२ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने लवारी येथे विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ लवारी व ग्रामपंचायत लवारी यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष अनिल किरणापुरे पं.स. सदस्य,प्रमुख पाहुणे गायत्री टेंभुर्णे सरपंच, सुरेश नगरीकर उपसरपंच,आर. एम.झोडे ग्राम विस्तार अधिकारी, देवराम किरणापुरे ,ओमप्रकाश लांजेवार, चंद्रशेखर कापगते, रमेश किरणापुरे, शालू कोसरे,सिमा शेंडे, लिलाबाई कापगते ,रूपाली इरले, विक्रांत बारापात्रे,सेवक निखारे, नीलिमा करंजेकर, आनंद कापगते, सुधीर किर्णापुरे,आत्माराम सोनकुसरे ,आर. के. नगरीकर, एस.के. गोटेफोडे, पुष्पा सोनकुसरे, तिर्थराज कोसरे, सकरू लांजेवार, प्रमिला गोटेफोडे, पुष्पां निमजे, मीरा सोनवाणे, कांता कडूकार ,विजय कंटकार, यमुना उरकुडे व समस्त गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला”व “स्वच्छ करूया गाव सगळे या क्षणी हो या क्षणी”अशा विविध भजनाच्या माध्यमातून गावात ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तेव्हा गावकऱ्यांना मार्गदर्शन देताना, अनिल किरणापुरे पं. स. सदस्य यांनी सांगितले की,बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले, एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकास कामे ही लोकसहभागातून करण्यात आली. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन , मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फुर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला.असे ते बोलत होते.