
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
येथील श्री जे एस पी एम महाविद्यालयात क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मेजर ध्यान चंद यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच विविध खेळांचे आयोजन केले.
विद्यार्थ्यांनी सर्व खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. क्रीडा व शारीरिक शिक्षण प्रमुख डॉ. संजय मुरकुटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
डॉ. किरमिरे यांनी अध्यक्ष स्थान भूषविले तसेच खेळाचे जीवनातील महत्व सांगितले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.