युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून नावलौकिक प्राप्त असलेले विकास गणेश उत्सव मंडळ दर्यापूर 79 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीकडे संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित असते त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी मंडळात युवकांचे नेतृत्व करणारी कार्यकारणी घटित करण्यात आलेली आहे.
यामध्ये अध्यक्ष पदी दर्यापूर येथील युवा नेतृत्व आणि वसू लँड डेव्हलपर्सचे संचालक उद्योजक अजय बद्रीया ( वसु ) तर उपाध्यक्ष पदी आतिश शिरभाते, अभिजीत उर्फ बंटी वानखडे यांची निवड तर सचिव पदी तुषार चौधरी,राहुल बैताळे,शंतनु बोरेकर,विजय चौधरी, नितिन पायरे,निलेश देशमुख, रविजित गणोरकर,चंदु शेवणे,गणेश शेवणे, यांचा समावेश करण्यात आलेली आहे.
यावर्षी या गणेशोत्सवाचे 79 वर्षे साजरे होत आहे दरवर्षी वेगवेगळे सजावटीतून आणि सामाजिक एकत्रीकरणातून तसेच भारतीय म्हणून एक होण्याचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करण्याची या मंडळाची परंपरा आहे.