सावली तालुक्यातील विविध गावात तान्हापोळा महोत्सव जलोषात साजरा…. — विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून नंदीबैल धारक बालगोपालांना स्कुलबॅगचे वितरण…

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

         विदर्भातील चिमुकल्या बालगोपालांसाठी आवडीचा व सर्वात मोठा सन म्हणजे तान्हापोळा, शेतकरी व ग्रामीण जीवनाशी निगडित असलेला लोकप्रिय सन असून बहुतेक लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे.

           लहाने मुलं या दिवशी लाकडी, मातीच्या बैलांना सजवून घरोघरी जातात. त्यांना काही दक्षिणा दिली जाते व तोंड गोड केल्या जाते. यामुळे लहान मुलांमध्येही बैल या पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीयन संस्कृती जपल्या जाते.शेती, शेतकरी आणि आपल्या कृषी प्रधान भारतीय संस्कृतीत बैलांना असलेले महत्त्व लहान मुलांना कळावे म्हणून खास लहान मुलांसाठी साजरा करण्यात येणारा तान्हा पोळा सावली तालुक्यात आनंदाने साजरा करण्यात आला.

          सावली तालुक्यात ग्रामीण तसेच शहरी भागात ग्राम काँग्रेस कमिटी व विजयभाऊ वडेट्टीवार मित्रपरीवार सावली यांच्या सौजन्याने तान्हापोळा निमित्याने वेशभूषा,नंदीबैल सजावट तसेच विवीध स्पर्धा या आयोजित करण्यात आल्या होत्या.

            त्यात चांद्रयान,शेतकरी आत्महत्या,ग्रामीण भागातिल जीवनमान, महिलांवरील अत्याचार,भ्रष्टाचार, महागाई या विषयावरील प्रतिकृतींनी महोसत्वाला लाभले अनन्य साधारण असे महत्व प्राप्त सावली शहरात जवळपास ३०० तर ग्रामीण भागात सरासरी ७०-८० बालगोपालांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

          सर्व सहभागी स्पर्धकांना राज्याचे विरोधी पक्षनेते ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे तसेच सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नंदीबैल धारक बालगोपालांना स्कुलबॅगचे वितरण करण्यात आले व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

          मनोरंजनात्मक गोष्टी, सजावट,डीजे,संदल यामुळे वातावरण आनंदिमय झाले होते.लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरूपण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी तान्हा पोळा’ साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात.

            स्पर्धेचा निकाल हा नंदीबैल सजावट व वेशभूषा या आधारावर देण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस सुद्धा देण्यात आलेले आहे. तान्ह्यापोळ्यात चिमुकल्यांनी सजावट केलेल्या नंदीबैलांना घेऊन प्रचंड गर्दी केली होती. वेगवेगळी आकर्षक वेशभूषा आणि केशभूषा करून लहान मुला मुलींनी तर वेधलेच सोबत सामाजिक संदेश सुद्धा दिला.