ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- “उमेद अभियान” हे केंद्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन करण्यासाठी राबविन्यात येणारी शासकीय योजना आहे. दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी देसाईगंज येथील सांस्कृतिक सभागृहात उमेद अभियान अंतर्गत वार्षिक अधिवेशन संपन्न झाले.
सदर झालेल्या वार्षिक अधिवेशनात जणू काही भाजपाचा प्रचार आणि प्रसार करून देण्यासाठी घेतलेला पक्षाचा कार्यक्रम असल्याचे निदर्शनात आले.. तो कार्यक्रम म्हणजे पूर्णतः राजकीय कार्यक्रम असल्यासारखे दिसत होते. भाजपचे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित असणे म्हणजे कुणाच्या तरी राजकीय दबावात किंवा समर्थनात हा कार्यक्रम घेतल्याचा आमचा आरोप आहे.
या कार्यक्रमामध्ये भाजप तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांच्यासह भाजपचे मोतीलाल कुकरेजा , वसंत दोणाडकर, रोशन पारधी, अर्चना ढोरे, गोपाल उईके, योगेश नाकतोडे इत्यादी नेते उपस्थित होते. ते प्रशासनाच्या कोणत्याही पदावर नसताना केवळ भाजपचे पदाधिकारी म्हणून कसे बोलवू शकतात. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात एका भाजपच्या एका नेत्याने RSS व भाजपचे नाव घेऊन भाषण दिले हे उमेद योजनेचा भाग आहे काय ?
सदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी देसाईगंज प्रभाग समन्वयक सचिन उपरे आणि प्रभाग व्यवस्थापक प्रशांत मंडपे यांनी राजकीय हेतूने शासनाच्या पैशावर भाजपा चे नेत्यांना बोलवून एका विशिष्ट्य पक्षाचा अजेंडा राबवित आहेत हे अत्यंत धोक्याचे आणि चुकीचे आहे.
त्यामुळे अशा विशिष्ट पक्षाची किंवा जातीय मानसिकता पेरणाऱ्या देसाईगंज प्रभाग समन्वयक सचिन उपरे आणि प्रभाग व्यवस्थापक प्रशांत मंडपे यांना ताबडतोब सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, सतीश दुर्गमवार उपस्थित होते.