युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर आगारामधिल महाराष्ट्र एस.टी कामगार संयुक्त कृती समिती आपल्या मागणी संदर्भात कालपासून धरणे आंदोलन देत असून दर्यापूर तालुक्यातील सर्व एसटी महामंडळाच्या बसेस ठप्प आगारांमध्ये उभ्या असून एसटी महामंडळाचे आंदोलनामुळे वाहतूक ठप्प पडलेली आहे.
नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे सदर धरणे आंदोलन हे एसटी कामगारांच्या मागणी मान्य करण्याकरिता व आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्याकरता कामगार धरणे आंदोलन करीत असून सदरच्या आंदोलनाला मनसे तालुकाध्यक्ष मनोज तायडे व उपतालुकाध्यक्ष पंकज कदम, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रथमेश राऊत उपशहर अध्यक्षा अनिकेत सुपेकर, राम शिंदे, संदीप झळके, इत्यादी कार्यकर्त्यांनी भेट दिली व त्यांना मनसेचा जाहीर पाठिंबा दिला.
कर्मचाऱ्यांनी त्यांचे निवेदन सन्माननीय राज साहेब यांना दिले असून सदरचे निवेदन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचवण्याची आश्वासन मनसे तालुकाध्यक्ष मनोज तायडे यांनी दिले.