दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर – बहुजन समता पर्व तथा जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता डॉ. दिलिप कांबले यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली की, शिवरायांचा अवमान हे महाराष्ट्राचे शिव,फुले, शाहू, आंबेडकरी प्रेमी खपवुन घेनार नाही.
त्या करीता दिनांक 4 सप्तेंबर 2024 रोजी शिवराय प्रेमी तर्फे संयुक्त संघटना मार्फत महराजाच्या पूर्णाकृती पुतळा कोसडल्याच्या व त्या मागच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ मोर्चाचे समर्थन बहुजन समता पर्व करित आहेत असी माहिती त्यांनी दिली.
भारताच्या सुवर्ण इतिहासाचा प्रामाणिक अभ्यास केल्यास सर्वोत्तम जनकल्याणकारी राजे म्हणून राजे, सम्राट अशोक मौर्य यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या जवळपास “पावने दोन हजार वर्षानंतर” ज्या राज्याचे नाव आदराने घेतले जाते ते छत्रपती शिवराय हे राजे होय.
शिवराय हे महात्मा फुले यांचे गुरु व महत्मा फुले हे बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु..या गुरू शिष्य परंपरेमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज ही कडी आहे. शिवरायांचे वंशज सयाजीराव गायकवाड व छत्रपति शाहू महाराजांनी बाबासाहेबांचे विदेशी शिक्षण, व बाबसाहेबांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या चळवळीसाठी जीवाचे रान केले. आणि म्हणून छत्रपती शिवराय ते फूले, शाहू, आंबेडकर,यांचा महाराष्ट्र ऊभा झालेला दिसतो.हा महाराष्ट्र संबंध भारताला दिशा देणारे राज्य म्हणून उदयास आलेले आहे.
बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान, बुद्ध, अशोका नंतर शिवराय फूले शाहू आंबेडकर विचारांचा जाहिर नामा आहे.असे असताना सुद्धा आज वर्तमानात कूठे ही पुतळे तोड़ले जातात तर कुठे भारतीय संविधान जाडले जाते.महात्मा फुलेंना देशद्रोही म्हटले जाते आणि पूढे त्याच धरती वर आज महाराज्यांच्या पुतळ्याची ही अवस्था करण्यात येत आहे करिता आम्ही सर्व शिव, फूले,शाहू, आंबेडकर व संपूर्ण शिवप्रेमी संघटना महाराष्ट्रात महाराजांचा अपमान सहन करणार नाही.
म्हणूनच याचा निषेध म्हणून उद्या 4 /8/2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येते निषेध मोर्चा काढणार आहे.
ही आमच्या अस्मितेची लढाई आहे. सर्व चंद्रपूर वासियांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हान डॉ.दिलिप कांबले ह्यांनी केले आहे.