भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा येथील श्री जे एस पी एम महाविद्यालयास नॅक समितीकडून ‘ब’ दर्जाचे मानांकन प्राप्त झाले. 22 व 23 ऑगस्ट 2024 रोजी बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) समितीतर्फे महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली.
दोन दिवस या समितीने महाविद्यालयातील सर्व विभागांचे शैक्षणिक उपक्रम, भौतिक सोई सुविधा, नवीन उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशासकीय बाबी, विद्यार्थी व पालक यांच्याशी थेट संवाद अशा अनेक गोष्टींची पाहणी केली.
श्री जे एस पी एम महाविद्यालयास मानांकन समितीने ‘ब ‘दर्जाचे मानांकन दिल्यामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्थापनेपासूनच या संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावला आहे. नॅक समितीचे प्रमुख प्रो. हेमांशू पांड्या (माजी कुलगुरू ) गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, वेंकटा कुर्मा ( प्रोफेसर इतिहास विभाग), डॉ गिल्सन जॉन ( प्राचार्य) जोसेफ कॉलेज चल्लाकडू त्रिसूर, केरळ यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाची पाहणी केली. प्राचार्य पंकज चव्हाण यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती समितीस सादर केली.
संस्थेच्या अध्यक्ष माननीय श्रीमती शालिनी मुनघाटे यांनी व महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी नॅक समितीचे स्वागत केले. आयक्यूएसी समितीचे समन्वयक डॉ. लांजेवार व प्रा. तोंडरे यांनी समितीचे संपूर्ण कामकाज हाताळले. सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.