साहोली जि. प. शाळेतील सिंधू टिपरे यांना तामसवाडी समुह साधन केंद्रस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी :- पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत येणाऱ्या समूह साधन केंद्र तामसवाडी द्वारा दिला जाणारा केंद्रस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार प्राथमिक शाळा साहोली येथील शिक्षिका सिंधू टिपरे यांना जाहीर करण्यात आला आहे.

         समूह साधन केंद्र तामसवाडी (पारशिवनी)तर्फे दरवर्षी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या एका सेवाज्येष्ठ शिक्षकांना शिक्षक दिनाच्या पर्वावर केंद्रस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते.

          यावर्षीचा हा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साहोली येथील सहाय्यक शिक्षिका सिंधू प्रकाश टिपरे यांना जाहीर करण्यात आला असून शिक्षक दिनाच्या पर्वावर मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असल्याचे केंद्रप्रमुख दिगांबर धवराळ, पुरस्कार आयोजन समितीचे संयोजक नंदकिशोर बावनकुळे यांनी कळविले आहे.