कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट-पिपरी रोडचे बाजुला असलेल्या घराच्या सिमेंटसिटच्या आडव्या लोखंडी खांबाला सौरभ राऊत या युवकाने दुपट्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहितीनुसार शनिवार (दि.२) सप्टेंबर ला रात्री १० वाजता मृतक युवक सौरभ तुलसी राऊत हा घरी गेला.तेव्हा सौरभ भरपुर दारू पिऊन होता. थोडा वेळ थांबुन सौरभ घराबाहेर निघुन गेला.
रविवार (दि.३) सप्टेंबर ला सकाळी ६ वाजता तुलसी कवडु राऊत वय ५३ वर्ष रा. गाडेघाट रोड पिपरी वार्ड क्र.६ कन्हान हे आपल्या घरी झोपुन असतांना वस्तीतील राकेश गणेश मेश्राम हा घरी आला व त्यानी सांगितले की तुमचा मुलगा सौरभ ने आकाश माहातोचे खुल्या घराच्या सिमेंटसिटचे आडव्या लोखड़ी खांबाला गळफास अन्वये आत्महत्या केली आहे.
अशा माहितीने तुलसी राऊत व घरच्या लोकांनी जाऊन पाहीले असता सौरभ हा सिमेंटसिटच्या आडव्या लोखंडी खांबास दुपट्याने गळफास लावुन लटकलेला अवस्थेत दिसून आल्याने त्यास हात लावून बघितले तर तो मरण पावला होता.
घटनेची माहिती तुलसी राऊत यांनी कन्हान पोलीसांना दिली असता पो.हवा.जयलाल सहारे,आशिक कुंभरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
सौरभ हा जास्त दारू पिण्याचा सवईचा असून तो जास्त घरी राहत नव्हता,दारूच्या नशेत त्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी तुलसी राऊत यांचे फिर्यादी वरुन पोस्टेला मर्गचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहाते यांचा मार्गदर्शनात पो. हवा. जयलाल सहारे हे करित आहे.