दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांची आळंदी शहर शिवसेना शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे त्यांना नियुक्ती पत्र शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राहुल चव्हाण यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत नुकताच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला होता प्रवेश केल्यावर दोन दिवसातच त्यांच्यावर आळंदी शहर शिवसेना शहरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, अशोक भुजबळ, निलेश गोरे, राजूशेठ जवळेकर, ज्योती आरगडे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, विजयसिंह शिंदे, राहूल थोरवे, योगेश पगडे, सचिन विरकर, ज्ञानेश्वर घुंडरे, हिरामण तळेकर, दिनकर तांबे, सचिन शिंदे, मोहन तळेकर उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राहुल चव्हाण यांची निवड करण्यात आली असून शिवसेना पक्षाची बांधणी करणे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करणे, शिवसैनिक नोंदणी करणे तसेच आळंदी शहरातील जनतेच्या समस्या सोडवण्याचे कार्य नवनिर्वाचित शहरप्रमुख राहुल चव्हाण यांना पार पाडावे लागेल स्वच्छ प्रतिमा असलेले राहुल चव्हाण यांचे आळंदी आणि परिसरात चांगले सामाजिक काम आहे. त्यांच्या निवडीने त्यांच्या वर विविध स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.