सोसायटी व ग्रामपंचायत पदाधिका-यांचे दुष्काळाबाबत तहसिलदारांना निवेदन…

 

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक

      शेतकऱ्यावर आलेल्या दुष्काळजन्य परिस्थीती साठी खल्लार सर्कल मधील सेवा सहकारी सोसायटी ,ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी ठराव घेऊन दुष्काळ जाहीर करुन मागील वर्षीचा नुकसान भरपाई कोणतीही अट न ठेवता. तात्काळ शेतकऱ्याच्या खातात्या जमा करावे.तसेच शेतकरी शेतमजूर ना पुढील सहा महिने सरकारी राशन देण्यात यावे.

        असेच शेतकऱ्यांना रब्बी साठी पुनर्गठन न करता शून्य व्याजदरावर शेतीकर्ज पुरवठा देऊन आथिर्क सहाय करावे… व २०२२-२०२३ व २०२३-२०२४ खरीप चे पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्याना देण्यात यावा.

         ह्याचे निवेदन तहसीलदार दर्यापूर तथा प्रतिलिपी जिल्हाधिकारी अमरावती,मुख्यमंत्री कार्यालय मुंबई यांना आज दि 4 सप्टेंबर रोजी देण्यात आले.

         यावेळी प्रामुख्याने निलेश साहेबराव मोपारी ,अध्यक्ष सेवा सह सोसा.मलकापूर योगेश अरुणराव मोपारी ,सरपंच ग्रामपंचायत खल्लार,जयकुमार जनार्धन भटकर सरपंच ग्रामपंचायत घडा,निलेश सुधाकरराव जुनघरे,उपसरपंच ग्रामपंचायत घडा,अंकुश भाऊराव रहाटे सदस्य, ग्रामपंचायत मोचर्डा प्रशांत बोरखडे सदस्य ग्रामपंचायत, घडा अशोकराव धाबे, अनिल इंगळे संचालक, सेवा सह सोसायटी मलकापूर. तथा शेतकरी उपस्थित होते.