ताफा थांबवून मदतीला धावले खासदार….. — खासदारांच्या तत्परतेने वाचले महिलेचे प्राण…..

 

प्रितम जनबंधु

संपादक 

भंडारा:- नियोजित कार्यक्रमासाठी खा. मेंढे आपल्या सहकाऱ्यांसह निघाले होते. वाटेत अपघात होऊन रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले एक कुटुंब दिसले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवून जखमींकडे धाव घेतली. तात्काळ स्वतःच्या गाडीत जखमींना टाकून रुग्णालय गाठले आणि उपचाराला सुरुवात केली. आज सहृदयी खासदारामुळे वेळेत उपचार मिळून महिलेचे प्राण वाचले. पुन्हा एकदा खा सुनील मेंढे यांच्यातील हळव्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडले.

        अनेकदा लोकप्रतिनिधी म्हटल्यावर कार्यकर्त्यांना कामाला लावणारे नेते आपण पाहतो. खासदार सुनील मेंढे यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडविले. सामान्य माणूसही बरेचदा रस्त्यावर मदतीची याचना करणाऱ्या लोकांकडे पाठ फिरवून निघून जातो. अशावेळी खासदार असलेल्या व्यक्तीने दुर्लक्ष केले असते तरी त्याचे फारसे कुणाला काही वाटले नसते. पण मुळातच संघ संस्कारात वाढलेल्या आणि सेवाभाव अंगी असलेल्या खा सुनील मेंढे यांनी कशाचाही विचार न करता संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला.

         नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना तुमसर शहराच्या सुरुवातीला बाजार समिती पुढे दुचाकीला अपघात झाला. पती पत्नी आणि मुलगा असे तिघेजण या दुचाकी ने प्रवास करीत होते. अपघातात महिला व मुलगा गंभीर जखमी झाले होते. डोक्याला मार लागून रक्तस्त्राव होत होता.

          मदतीसाठी याचना करीत असतानाच तुमसर कडे जात असलेल्या खासदारांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबून स्वतः जखमींकडे धाव घेतली त्यांच्यासोबत असलेले सहकारी कर्मचारी आणि रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने कुठलाही विचार न करता स्वतःच्या वाहनात तीनही जखमींना टाकीत शासकीय सुभाषचंद्र बोस रुग्णालय गाठले. जखमींना रुग्णालयात पाठवून कार्यक्रमाला निघून न जाता स्वतः खासदार रुग्णालयात पोहोचले. वैद्यकीय अधिकारी आणि सहकाऱ्यांना योग्य आणि पुरेपूर उपचार करण्याच्या सूचना देऊन जखमींच्या नातेवाईकांशी संवाद साधून नंतर कार्यक्रमाचे ठिकाण गाठले. मात्र त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना जखमी कुटुंबासोबत ठेवण्यास ते विसरले नाहीत.

        जखमींची पुरेपूर काळजी घेऊन आणि त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था त्यांनी केली. आजही राजकीय नेत्यांमध्ये आपुलकी आणि सामान्यांप्रती जिव्हाळा शिल्लक असल्याचे खासदारांच्या या कृतीतून उघड झाले. खासदारांनी दाखवलेल्या या तत्परतेची चर्चा मात्र सर्वत्र आहे.