उमेश कांबळे ता प्र भद्रावती
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ची सिनेट निवडणूक दि ४ सप्टेंबर ला झाली. निवडणुकीत नेहमीप्रमाणे मतदारांचा ऊत्साह दिसला नाही. साधारणतः 45 % मतदान नोंदवीण्यात आले. या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे सद्या सांगणे कठीण असले तरी नवोदितांना या निवडणुकीत प्राधान्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीत शिक्षक आघाडी, शिक्षक परिषद व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच परिवर्तन पॅनल यांनी आपआपले उमेदवार उभे केलेले आहेत. पदवीधर मतदारसंघात सर्वच गटांनी आपापले १० उमेदवार उभे केले आहेत.
या निवडणुकीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नोंदनीकृत पदवीधर यानी मतदानाचा अधिकार बजावले. विविध प्राधिकरणाची निवडणूक सुद्धा झाली .त्यात या तीनही पॅनलने आपले उमेदवार उभे केल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत भरलेली होती . या निवडणुकीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मात्र अविरोध निवडून आलेले आहेत. यात डॉक्टर विवेक शिंदे व दोंतुलवार यांनी ही निवडणूक अविरोध होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज उर्वरित प्राधिकरणासाठी व पदवीधर मतदारसंघातील निवडणूक शांततेत संपन्न झाली . सदरचा भद्रावती तालुक्यात 45 टक्के मतदार नोंदणी झालेली असून मतदार यांनी कोणाच्या पारड्यात आपली मतं टाकली याची उत्सुकता मात्र उमेदवारांच्या हृदयातील धाडकन वाढवत आहे.
आज मतदान झाल्यावर सात तारखेला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे . तेव्हा मात्र सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तीनही पॅनल कडून आमचे उमेदवार निवडून येणार अशी दावेदारी केली जात आहे .मात्र निवडणुकीत यश कोणाच्या पारड्यात जाणार हे मात्र येणाऱ्या सात तारखेला निश्चित होणार आहे. तो पर्यत उमेदवार आपल्या मतांची गोळा बेरीज करत आहेत.