विवेक रामटेके

बल्लारपूर तालुका ग्रामीण

 

कोठारी (चंद्रपूर) : प्रेम आंधळ असतं, त्याला वयाची सीमा नसते. प्रेम कधी, कुणासोबतही होऊ शकते. कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष भेटीतून प्रेम व्यक्त होत असते. आता सोशल मिडीयावरून प्रेमाचे फूल गुंफल्या जात असल्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अशाच प्रकारातून कोठारी येथील ६७ वर्षीय महिलेची फेसबुकवरून गोंदियाच्या ४५ वर्षीय पुरुषासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमाचे तार जुडले व दोन वर्षापर्यंत निरंतर सुरू होते. विश्वास संपादन केल्यानंतर घरी येणे-जाणे सुरू झाले व एक दिवस फेसबुक फ्रेंड्स आपल्या वयोवृद्ध मैत्रिणीला हळूवार दगा देत १० लाख किमतीचे २५ तोळे सोने घेऊन पसार झाला. ही घटना बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात उघड झाली आहे.

 

वयोवृद्ध महिलेला एका फेसबुकमित्राने दहा लाखाचा चुना लावून प्रेमाची खरी पावती दिल्याची खमंग चर्चा कोठारी परिसरात रंगली आहे. फेसबुक फ्रेंडशिप करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी जिवंत उदाहरण व प्रेमाची चपराक असल्याने फेसबुकमित्र-मैत्रिणींनी बोध घेण्यासारखे आहे.

 

           कोठारी गावातील ६७ वर्षीय विधवा महिला असून तिला एक मुलगा आहे. मुलगा नोकरीनिमित्त परप्रांतात राहतो. महिला घरी एकटी राहत असते. तीन वर्षांपूर्वी गोंदिया येथील सुमित बोरकर नामक ४५ वर्षीय पुरुषासोबत तिची फेसबुकवरून मैत्री झाली. त्याने आपण एमबीबीएस डॉक्टर असून अकोला येथे कार्यरत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व तो अधूनमधून कोठारीत येऊन मुक्काम करायचा. हा प्रकार मागील तीन वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा गावात असली तरी त्या महिलेने आपली ओळख दोन वर्षांपूर्वी नागपूर-चंद्रपूर बसमध्ये झाली होती. तेव्हापासून आम्ही नेहमी व्हाटसॲप व फेसबुकवरून बोलत होतो. यादरम्यान त्याने एकदा माझ्या घरी मुक्काम केल्याची कबुली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिली आहे. आरोपी कोठारीत सदर महिलेच्या घरी ३० ऑगस्टला आला. तक्रारकर्त्या महिलेच्या घरी मुक्कामी राहून मटनासोबत बियर ढोसली. रात्रभर तिचे घरी योग्य संधीची प्रतीक्षा करीत निवांत झोपला. ३१ ऑगस्टला नेहमीप्रमाणे महिला पहाटे ५.३० वाजता बाहेर फिरायला जात असल्याचे मित्राला सांगून निघून गेली. या संधीचा फायदा घेत आरोपी महिलेच्या घरून २४.७ तोळे सोने घेऊन बल्लारपूरच्या दिशेने ऑटोने फरार झाला. महिला फिरून घरी परतली तेव्हा तिला तिचा मित्र दिसला नाही. घरातील कपाट तपासले असता त्यातील सोन्याचे दागिने लंपास झालेले दिसले. तत्काळ महिलेने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून कोठारी पोलिसांनी भांदवी ३८० कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे. सोन्याची किंमत ९ लक्ष ८८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी चौफेर नाकाबंदी केली; मात्र आरोपी कुठेही आढळून आला नाही. आरोपी चार दिवसांपासून फरार असून त्याचा कसून शोध पोलिस स्टेशन कोठारी चे प्रभारी ठाणेदार प्रमोद रासकर व त्यांची चमू घेत आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com