बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
टणु तालुका इंदापूर येथील रिंग रोड रस्त्यासाठी 4 कोटी रुपये मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन समारंभ माजी मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भूमिपूजन प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की,टणु गाव हे पन्नास वर्षापासूनच आपल्यासोबत असल्यामुळे,पाठीमागच्या कळातही भरघोस वमताधिक्याने आपल्याला साथ दिली.
गेली दहा वर्षापासून इंदापूर तालुक्याचा विकास थांबलेला आहे.विकास चांगल्या प्रकारे घडवून आणण्यासाठी जशी पाठीमागे साथ दिली तसीच इथून पुढेही साथ द्यावी.
गोरगरिब आसतील,शेतकरी व शेतमजूर या सर्वांना कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत.आज उद्घाटन केलेल्या रस्त्याचे काम हे दर्जेदार व चांगल्या प्रकारे झाले पाहिजे.कामात ठेकेदारांनी हलगर्जीपणा करता कामा नये,ग्रामस्थांनीही रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन काम करून घ्यावे,आशा सूचना काम करणाऱ्या ठेकेदाराला पण देण्यात आल्या.
रस्ता चांगल्या दर्जाचा होणे अपेक्षित आहे.गावच्या वतीने संचालक प्रकाश मोहिते यांनी मागितलेल्या सर्व मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी सतत तुमच्या पाठीशी आहे असल्याचे उदगार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भूमिपूजन प्रसंगी काढले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील,निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,संचालक संजय बोडके,संचालक प्रकाश मोहिते,माजी सरपंच विलास ताटे,माजी सरपंच संतोष मोरे,उद्योजक विजय सरवदे,चेअरमन निलेश बोडके,ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल घोगरे,सरपंच समीर मोहिते,विद्यमान सरपंच तेजस मोहिते,सरपंच राजेंद्र मोहिते,नाथाजी मोहिते,आजीत मोहिते,नेताजी मोहिते,सयाजी मोहिते,चंद्रकांत जगदाळे,सतीश बळते,विठ्ठल बळते,राजेंद्र चव्हाण,सत्यवान मोहिते,सुरेश चव्हाण,सतीश बोडके, संदीप मोहिते सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.