पेंच-नवेगाव(खैरी)धरणाचे सर्व दरवाजे केले खुले.. — नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी                             

पारशिवनी:- पेंच – नवेगाव (खैरी) धरण पुर्णतः भरले असल्याने धरणातील पाणी विसर्गासाठी सर्व शोळा दरवाजे खुले केले आहेत.

        मध्यप्रदेश मध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चौराई धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे.तोतलाडोह धरणात येवा वाढला असून तोतलाडोह धरणाचे वक्रद्वार उघडण्यात आले आहे. 

         तसेच तोतलाडोह जलविद्युत निर्मितीतून बाहेर पडणारा पाण्याचा विसर्गामुळे आज दि.४/०८/२०२४ ला सायंकाळी  ५:१५ वा. पेंच नवेगाव धरणाचा पाणीसाठा १००% झाल्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता  जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे  सर्व १६ गेट सांयकाळी ५.१५ वाजता १० गेट ०.३० मी. सहा गेट ०.५० मीटर उंचीने उघडण्यात आले आहे.यामधून ६३८.१४० क्यूमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

       यामुळे कन्हान नदी व पेंच नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतःची काळजी बाळगावी असे आवाहन करण्यात आले.याचबरोबर नदीपात्रा जवळ जाणे टाळावे असीही सुचना करण्यात आली आहे.

        सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन तसे सर्व संबंधितांना त्वरित सुचीत करण्यात आले आहे.

        तसेच जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो,त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे.सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन तसे सर्व संबंधितांना त्वरित सुचीत करण्यात आले आहे.

       पेंच-नवेगाव(खैरी) धरणात पाणीसाठा टक्केवारी शंभर टक्के आहे.अशी माहिती उपविभागीय अभियंता

पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवणी यांनी व तहसिलदार राजेश भंडारकर यांनी दिली आहे.