रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
मागील वर्षात चिमूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे,रान डुक्कर,माकड, नीलगाय,हरीण ल अन्य वन्यप्राण्यांनी नुकसान केले.यात धान,सोयाबीन,तूर,कपास,हरभर,गहू पिकांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या विविध पिक नुकसानी अंतर्गत आर्थिक मदत अजून पर्यंत त्यांना मिळाली नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
चिमूर,शंकरपूर,नेरी,भिसी,खडसंगी,पळसगाव, नागभिड, तळोधी(बा.)वनविभाग कार्यालयाला शेतमाल पिक नुकसानी बाबत लेखी तक्रार नोंद केल्यात.यानुसार शेतमाल पंचनामे झाले.पण,अजून पावेतो शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत.तेव्हा शेतकऱ्यांचा वाली कोण?असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
केवळ शेतकऱ्यांना वेठीस धरून थट्टा होताना दिसत आहे.याबद्दल शासन उदासीन का?असाही प्रश्न निर्माण होत आहे.
तेव्हा संबंधीत वन विभागांनी तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळणे बाबत कार्यवाही करावी याबाबत चिमूर तालुका भाजपा माजी महामंत्री तथा माजी सरपंच ज्ञानेश्वर शिरभय्ये यांनी मागणी केली आहे.