महेश गायकवाड व आमरसिंह जगताप यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल,”पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान,!..

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपूर प्रतिनिधी

         महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी महेश भीमराव गायकवाड व अमरसिंह जगताप गिरवी यांची पदोन्नती झाल्याबद्दल पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने,”गायकवाड परिवारातील – ठोकळे परिवारातील सदस्यांचा आणि दोन्ही उपनिरीक्षक महोदयांचा शाल-श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

            यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महेश गायकवाड व आमरसिंह जगताप यांनी करून आशीर्वाद घेतला.

          निवडी नंतर महेश गायकवाड बोलत असताना म्हणाले की मी गरीबूतून लहानाचा मोठा झालोय.पिंपरी बुद्रुक गावाने व माझ्या परिवारातील गायकवाड परिवारातील व ठोकळे परिवारातील ग्रामस्थांनी मला लहानपणापासून आधार दिला. त्यामुळेच मी आत्ता पीएसआय झालो याचा मला व माझ्या पिंपरी गावाला आनंद झाला. 

          या आनंदाचा क्षण मी कधीच विसरणार नाही.जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून पास झालो आणि तुमच्या सारख्या वडीलधारी माणसाने माझ्यावर विश्वास ठेवलाय यामुळे,” लहानाचा मोठा झालो, हीच ती खरी पुण्याई आहे असे उद्गार सत्कार समारंभ प्रसंगी महेश गायकवाड यांनी काढले. 

        यावेळी गिरवी गावचे पोलीस निरीक्षक (पीएसआय) आमरसिंह जगताप हे पिंपरी बुद्रुक गावातील विकास सेवा सोसायटीचे सेक्रेटरी तुकाराम मगर यांचे जावई आहेत.यांनीही सत्कार प्रसंगी आपले विचार व्यक्त केले व ग्रामस्थांचे आभार मानले.

        या कार्यक्रमा प्रसंगी साखरकारखाना संचालक संजय बोडके माजी चेअरमन सुनील बोडके,चेअरमन राजेंद्र मगर,पोलीस पाटील वर्धमान बोडके,माजी ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके,विद्यमान सरपंच सुदर्शन बोडके,तुकाराम मगर,सोमनाथ बोडके,पोपट बोडके,आबासो बोडके, बाळासाहेब शेलार,शहाजी अण्णा बोडके,दादाभाई शेख,लक्ष्मण गायकवाड,दिलीप ठोकळे,शिवाजी गायकवाड,युवराज गायकवाड,नागेश गायकवाड,जयसिंह पाटील,आशोक पाटील,महेश पाटील,बाळासाहेब गायकवाड,ज्योतीराम सरतापे,बाळासाहेब सुतार, शंकर रणदिवे, भाऊ रणदिवे सह सर्व पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील महीला व ग्रामस्थांच्या वतीने,पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक आमरसिंह जगताप यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

        या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांबवे तालुका माळशिरस येथील भूषण बिबीशन घाडगे व बिबीशन घाडगे यांनी केले…

        संपर्कासाठी..

मोबाईल नंबर — 9970895362 — 9359758992….