दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
सिंदेवाही :: सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले बिट जमादार विनोद बावणे यांना पदोन्नती मिळाली असून ते आत्ता पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
सिंदेवाही पोलीस स्टेशनला बिट जमादार म्हणून पदभार सांभाळल्या पासून त्यांचे कार्य आणि कामगिरी अत्यंत चांगली असून,त्यांच्या कार्य आणि कर्तव्यावर नागरिक समाधानी आहेत,कर्तव्य करतांना आपण ही या समाजाचा एक हिस्सा आहोत व समाजाप्रती आपलेही काही देण आहे या भावनेतून स्वतःच्या कार्यक्षेत्रा मधील गोर-गरीब व बिकट परिस्थिती असलेल्या नागरिकांना कधी आर्थिक तर कधी वस्तूचा स्वरूपात ते मदत करीत असतात.
कोणत्याही प्रसिद्धीची हाव नसल्याने,मदत केल्याचा गाजवाजा कुठेच करत नाही.”म्हणतात ना!..”कोणाला जर निःस्वार्थ भावनेने मदत करायची असेल उजव्या हातानी काय करतो ते डाव्या हाताला पण कळायला नको.अश्या प्रकारे सामाजिक जाणीव ठेऊन आपल्या सेवाभावाचे कार्य ते करीत असतात.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन बौद्ध समाज पळसगाव ( जाट ) व धम्मगिरी तालुका विकास समिती धानोरा ( मरेगाव ) येथील कार्यक्रमा मध्ये शाल व ट्राफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
जमादार विनोद बावणे यांना पदोन्नती मिळून ते आत्ता पोलीस उपनिरीक्षक झाले अशी माहिती मिळताचा असंख्य नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
शासकीय नोकरी मध्ये किती कमावलं याला अर्थ नसून माणुसकी व प्रेमाने किती माणसं जोडली याच उदाहरण म्हणजे विनोद बावणे आहेत.त्यांचे मैत्री पुर्वक प्रेमळ मन निष्कलंक असल्याने ते आजही नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.पोलीस उपनिरिक्षक म्हणून त्यांच्या पुढील कार्यासाठी अनंत शुभेच्छा…