नंदलाल पाटील कापगते विद्यालय येथे माता /पालक – शिक्षक संघाची स्थापना…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

         साकोली : नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे माता/पालक शिक्षक सभेचे आयोजन करून माता/पालक – शिक्षक संघाची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आले. 

             याप्रसंगी सभेचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर. बी. कापगते तसेच प्रमुख अतिथी प्रा. के.जी. लोथे, प्रा. स्वाती गहाणे, डी.एस. बोरकर, सेवानिवृत्त शिक्षक मुरलीधरजी गजापुरे व इतर मान्यवर उपस्थित होते. 

           सभेचे अध्यक्षा व प्रमुख अतिथी यांनी दीप प्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. 

            पालक सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. सभेचे उद्दिष्ट व कार्यप्रणालीची माहिती आर.व्ही.दिघोरे यांनी प्रास्ताविकेतून दिले तसेच विद्यालयामध्ये वर्षभर होत असलेल्या विविध उपक्रम व विविध स्पर्धा ,क्रीडा स्पर्धा, चित्रकला परीक्षा, बौद्धिक स्पर्धा, विज्ञान मेळावा तसेच विविध शिष्यवृत्ती बाबत विद्यालयात होत असलेली कार्यप्रणाली यांची सविस्तर माहिती ज्येष्ठ शिक्षक राजेश कापगते यांनी दिली. 

           शिक्षक पालक परिचयानंतर पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री अविषकुमार भैसारे, तर सचिवपदी एस.आर. देशमुख , सहसचिव महादेव लेंंढे यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच माता-पालक संघाचे अध्यक्षपदी सौ. कीर्ती बावनकर , सचिवपदी प्रा.एस.एन.गहाणे, सहसचिव सौ.नीता कापगते यांची निवड करण्यात आली.

             त्याचप्रमाणे 17 सदस्यीय शाळा व्यवस्थापन समिती सुद्धा नव्याने गठीत करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून ऋग्वेद येवले उपाध्यक्ष सौ.ज्योती रहांगडाले, सचिव श्रीमती आर.बी.कापगते शिक्षणतज्ञ मुरलीधरजी गजापुरे यांची निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त मान्यवरांचे विद्यालयाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

           नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

             सभेचे अध्यक्षा श्रीमती आर.बी कापगते यांनी आपल्या मार्गदर्शनातून पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या समन्वय महत्त्वाचा असतो व तो सुरळीतपणे साधला जातो हा विश्वास व्यक्त केला, तसेच शालेय गुणवत्तावाढ व शालेय शिस्त राखण्यासाठी प्राथमिक दिली जाऊन पोषण आहार व परिसर स्वच्छता या बाबींवर विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा मानसिक व बौद्धिक विकासाकरिता भर दिला जाईल असे आश्वासित केले.

            कार्यक्रमाचे संचालन एस.आर.देशमुख व एस.व्हि.कामथे यांनी तर आभार प्रदर्शन सोनाली क-हाडे यांनी केले. 

            सभा यशस्वी करिता सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.