प्रत्येकांनी संविधानविरोधी शक्तीला आपल्यावर (संविधानवाद्यावर) हवी होऊ न देता प्रतिकार करण्यासाठी लिहून,बोलून अभिव्यक्त होण्याची आज,आता,ताबडतोब सुरुवात करा…
केवळ गाणी आणि भुलभूल्लया शब्दांच्या जंजाळात न अडकता परखड आणि सत्यावर आधारित परिणामकारक क्रांती करण्याचे पाईक व्हा…
लिहिता येत नसेल,बोलता येत नसेल,निदान चांगल्या आचार आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे माध्यम तरी बना..
कारण ही वेळ एकमेकांचे उणेदुणे काढण्याची नाही.किंवा मी या संघटनेचा आणि तो त्या पक्षाचा मी तिथे का जाऊ….?
देशात संविधानविरोधी आणि संविधानवादी दोनच विचार आणि संस्था आहेत….!
त्यासाठी संविधानवाद्यानी आपली भूमिका सरमिसळ न करता स्पष्ट आणि परखड भूमिका घेऊन,विष आणि औषध यांची सरमिसळ होऊच शकत नाही.हे समजून घेऊन आपल्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे,आर्थिक क्षमतेप्रमाणे,संघर्षातून योगदान द्यावे.
कारण घड्याळीच्या काट्याला जन्म आणि मृत्यू नसतानाही तो थांबत नाही……!
आपल्याला जन्म लाभल्यानंतर मृत्यू अटळ आहे हे ठाऊक असतांना आम्ही का थांबायचं?
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय सुद्धा लोकशाही व संविधान वाचविण्याचा काजवा आता विझला आहे……!!!!
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689..