भावार्थ रामायण ऐकण्याचा नामरस भाविकांनी घ्यावा, वाचक व सुचक संदिपान (आपा) पडळकर यांचे उद्गार… — उद्यापासून सोमवारी श्री भावार्थ रामायणाला पिंपरी बुद्रुक येथील हनुमान मंदिर येथे प्रारंभ होणार आहे…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील हनुमान मंदिर या ठिकाणी दरवर्षी सालाबाद प्रमाणे श्री भावार्थ रामायण ग्रंथ वाचनाला प्रारंभ उद्यापासून सोमवारी दि. 5/ 8/ 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आसुन  जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज, यांच्या हस्ते ग्रंथ व प्रतिमा मूर्ती पूजन हे इंदापूर तालुका तहसीलदार श्रीकांत पाटील, यांच्या उपस्थितीत होणार आहे.

           ध्वज पूजन इंदापूर तालुका पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांच्या हस्ते होणार आसून दीप प्रज्वलन डॉक्टर ह भ प लक्ष्मण महादेव आसबे महाराज यांच्या शुभ हस्ते होणार आसुन, पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थितीत श्री भावार्थ रामायणला प्रारंभ होत आहे. 

               या कार्यक्रमासाठी वाचक सूचक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आसल्याचे ह भ प बाळासाहेब घाडगे महाराज व ह भ प महेश सुतार महाराज, वाचक व सुचक संदिपान (आपा) पडळकर बोलत होते.

            या कार्यक्रमासाठी सहकार महर्षी साखर कारखाना संचालक श्रीकांत बोडके, माजी सरपंच आबासाहेब बोडके, माजी चेअरमन आशोक आबा बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, सरपंच भाग्यश्री बोडके, उपसरपंच संतोष सुतार, व सर्व ग्रामपंचायत सदस्य सह आजी माजी सरपंच ,उपसरपंच पत्रकार बांधव आणि, पंचक्रोशीतील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .