नाथपंथीय नवनाथा पैकी भर्तरीनाथ मंदिर या ठिकाणी टणु ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक भंडारा उत्सव संपन्न… — हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद….

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

           टणु गावचे ग्रामदैवत भरतरीनाथ महाराजांचा सालाबाद प्रमाणे मंदिरात भंडारा उत्सव साजरा करण्यात आला.

           या भागाचे भरतरीनात ग्रामदैवत हे पुराण काळातील नव नाथपंथीय आसल्यामुळे कुलदैवत म्हणून ओळख आहे. भंडारा उत्सव सालाबाद प्रमाणे मोठा साजरा करण्यात येत आसतो. इंदापूर , पंढरपूर , माढा, माळशिरस या तालुक्यातील सर्व भागातून भावीक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           भरतरीनाथाची मनोभावे पूजा करून महाप्रसाद घेऊन आनंद व्यक्त करतात. मिठाई व खेळण्याचे स्टॉलही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते. लहान बालके खेळणी व मिठाई घेण्यासाठी आनंदाने खरेदी करीत आनंद घेतला.

          टणु येथील विद्यमान सरपंच उपसरपंच आजी-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भरतरीनात मंदिरात भंडारा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. हजारो भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला.