
दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
विदर्भात दोन तीन दिवस पाऊसाच्या सरी सातत्याने आल्यात व शेतकऱ्यांनी खरीप हंगामाला वेग दिला.मात्र अचानक पाऊसाने दडी मारल्याने पेरलेल्या व टिपलेल्या बिजांचे आणि उगवलेल्या सोयाबीन,पराठी,भात पऱ्हाचे काय होणार?या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत.
शेतकऱ्यांजवळ एका पेरनीचे बीज असते किंवा त्या बिजाई पुरते रुपये असतात.जर पाऊसाने दडी मारली तर शेतकऱ्यांवर परत लागवडीसाठी किंवा पेरणीसाठी बिजाईची आव्हानात्मक समस्या निर्माण होणार आहे.
म्हणूनच शेतकरी पाऊसाची आतूरतेने वाट बघत आहेत.मात्र निसर्ग काय करतो याचा अंदाज नाही.