नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली:नवजीवन कॉन्टेंट एंड इंग्लिश प्राय स्कुल (सीबीएसई) साकोली येथे २०२३ २४ शैक्षणिक सत्रातील प्रथम दिनी विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहपूर्ण करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय परिसर, वर्गखोल्या व शालेय प्रांगण अतिशय मनमोहक पद्धतीने करण्यात आली होती. शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पंचारती ओवाळणी करून व पुष्पगुच्छ, भेटवस्तू देउन त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत वर्गखोल्यांमध्ये प्रवेश करवून दिला गेला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी तोंड गोड करून सर्वांचे अभिनंदन केले गेले. नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी स्वतः तयार केलेले भेटकार्ड देउन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास व प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान, सतिश गोटेफोडे, जयंत खोब्रागडे, अजय बाळमुद्दे, किशोर बावनकुळे, विन्दुष नेवारे, दुर्वास लंजे, श्रीधर खराबे, अशोक मीना, विजय परशुरामकर, जोशिराम बिसेन, प्रशात वालदे, सरताज साखरे, रोझी पठान, सुनिता बडोले, विशाखा पशिने, वैशाली भगतकर, विद्या यांमुळे, दिपा मेले, पुण्यप्रभा उपासे, रुनाली पंचरे, प्रियंका निवेकर, प्रतिमा डोंगरे, स्वेजल डेंभुर्णे, माधुरी हलमारे, ज्योती डोंगरवार, लिलेश्वरी पारथी, वैशाली राउत, रेखा हातझाडे, प्रांजली गजभिये, स्मिता मस्के, माधुरी बन्सोड, अनिता धुर्वे, मेघा संग्रामे तसेच इतर शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.