दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ वर्षात विविध परीक्षेत, स्पर्धेत याष संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये एन.एम.एम.एस. व सारथी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता ९ वी ते १२ वी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यां समवेत दिव्यांग विभागातील विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, रोक रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ऋतुजा काचगुंडे ही विद्यालयाची माझी विद्यार्थिनी हिने NEET परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत MBBS साठी पात्र ठरली. तर संस्कृती वाघे हिने जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले यांचा सुध्दा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी चंद्रकांत महाराज डुंबरे, नैनाताई कामठे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, ज्योतीताई चोरडिया तसेच विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व नारायण पिंगळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.