पारशिवनी:- तालुका तिल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पारशिवनीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सामाजिक वनिकरण. पारशिवनी विभाग नागपूर अंतर्गत नगर पंचायत पारशिवनी परिसरात रोपे लागवड करून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये नगर पंचायत कार्यालय पारशिवनी प्रांगणात मा . नगरपंचायत अध्यक्ष श्रीमती कुंभलकर मॅडम व मान्यवर यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

नगरपंचायत कार्यालय पारशिवनी येथे कन्या वन समृद्धी योजने अंतर्गत नगरपंचायत पारशिवनी सभागृहात येथील शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना प्रत्येकी 5 सागवान व फळझाडांचा शेट्यांचे वाटप करण्यात आले . या योजनेमुळे मुलगी मोठी होईपर्यंत वृछ मोठे होवून त्यातुन उत्पन्न मिळवून महिला सक्षमीकरणाचे ध्येय साध्य होईल . हा योजनेमागील उद्देश असल्याचे सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती एन . आर . डकरे यांनी सांगितले . या वेळी नगरपंचायत ची नगरअध्यक्षा श्रीमती प्रतिभा कुंभलकर , मुख्याधिकारी अर्चना वंजारी , वनपरिक्षेत्र अधिकारी निलिमा डकरे , वनपाल व्ही . जे . येरपुडे , वनमजूर एन . बी शेंडे , डी.आर. ठाकरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com