निरा नरसिंहपुर दिनांक:4

प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

सराटी तालुका इंदापूर येथे पुणे जिल्ह्यातील शेवटी मुक्कामा ठिकाणी संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा दाखल होऊन सराटी गावच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.

पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हानुमंत कोकाटे, सराटी ग्रामपंचायत सरपंच बापूसाहेब कोकाटे, पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, महेश जगदाळे, पैलवान रोहित जगदाळे, पैलवान आमर जगदाळे, वकील राजेंद्र जगदाळे, भैय्या कोकाटे, मनोज जगदाळे, बाबासाहेब कोकाटे, या सर्वांच्या उपस्थितीत सराटी येथील पावन भूमीमध्ये संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी आगमन झाल्यानंतर टाळ आणि मृदंगाच्या आवाजात नामाचा गजर व जयघोष करीत सराटी नगरीमध्ये पालखी दाखल होऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. पालखी सोहळ्यासाठी आलेले सर्व भाविक भक्त व वारकरी दिंडी सोहळा प्रमुख देहू संस्थान अध्यक्ष ह भ प नितीन गोपाळ मोरे, विश्वस्त भानुदास अंकुश मोरे, संतोष नारायण मोरे, माणिक गोविंद मोरे, संजय दामोदर मोरे, अजित लक्ष्मण मोरे, देहू संस्थान पालखीच्या बरोबर आलेले सर्वच विश्वस्त व वारकऱ्यांचे तसेच शासकीय अधिकाऱ्यांची गावच्या वतीने स्वागत करून अन्नदान व भोजनाची व्यवस्था सराटी गावच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी स्वच्छ, अन्नदान, सार्वजनिक शौचालय, राहण्यासाठी स्वच्छ, जागा उपलब्ध आशा अनेक प्रकारे सुख आणि सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. पालखी सोहळ्यासाठी आलेल्या भाविक भक्तांची कोणतीही अडचण येऊ देणार नाही आसे सराटी येथील जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुका आध्यक्ष हानुमंत कोकाटे, सरपंच बापूसाहेब कोकाटे, यावेळी बोलत होते.

 

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com