वणी :- परशुराम पोटे

 

शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झाल्याने जनता हैराण झाली असून ते खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या पावसाचे दिवस असल्याने वणी शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ुयाच्या समस्येने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहे. विद्यार्थि हे याच मार्गावरून जात असता,खड्ड्यामधे पाणी साचल्याने खड्डे दिसत नसल्याने अपघात होऊ शकतो. शहरात खड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी केली असून जर हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात न आल्यास आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा निवेदनातु देण्यात आला आहे. 

निवेदन देतेवेळी इजहार शेख, विकेश पानघाटे, जईम अजीज, सुधीर खंडाळकर, इरफान ससय्यद,राजू पेंढारकर, सुमीत ठाकरे,साहिल सय्यद, महादेव दोडके ईत्यादी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com