पारशिवनी :_पारशिवनी तहसीलच्या तामसवाडी गावातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पारशिवनी पोलिसांनी सायंकाळी 6 च्या सुमारास पकडला. तहसीलच्या तामसवाडी शिवारातील कन्हान नदीत अवैध वाळू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पारशिवनी पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच ठाणेदार राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथक,चे हेडकॉन्स्टेबल संदीप कडू, मुदस्सर जमाल यांनी नाकाबंदीचे नियोजन केले. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर नदीतून गावाच्या दिशेने येताना दिसला. ट्रॅक्टर थांबवून पोलिसांनी चालक गणेश शिवाहुके याच्याकडे रॉयल्टी व कागदपत्रांची चौकशी केली असता त्यानी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. चालक गणेशने सांगितले की, मालक विजय रामराव गोमकले यांच्या सांगण्यावरून कन्हान नदीतून वाळू चोरत होता. ट्रॅक्टरचा क्रमांक स्पष्ट नसून एमएच-31, एच-7024 या ट्रॉलीमध्ये सुमारे अर्धा ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त करून पोलीस ठाण्यात दाखल केले. ट्रॅक्टर मालक विजय रामराव गोमकाळे, चालक गणेश शिवाहुके, मजूर सूरज देवगडे, केशव वहिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वाहनासह एकूण 6 लाख 3 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा ची पुढील तपास पारशिवनी पोलीस स्टेशन चे सिपाई पुढील तपास करत आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com