अकोट‌ प्रतिनिधी

 

अकोट पोपटखेड रोडवरील तालूका संकूल मैदानावर असलेल्या व्यायाम शाळेच्या इमारतीच्या बाजूला कुठल्याच प्रकारचा अडथळा नसलेल्या ३ हिरव्यागार निंबाच्या वृक्षांची‌ अवैधरीत्या कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत तालुका क्रीडा संकुलाच्या संबधीत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी तो मी नव्हे‌ असा पवित्रा घेत मी फक्त वृक्षाच्या फांद्या कापण्याचे सांगितले होते सदर निंबाचे वृक्ष उध्वस्त केल्याची मला माहिती नाही‌ म्हणून हात वर केले आहेत.

 

एकीकडे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने करोडो रुपयांचा खर्च करून विविध योजना अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहेत‌‌ दुसरीकडे जबाबदार प्रशासकीय अधिकारी तालुका क्रीडा संकुल मैदानातील अवैध वृक्षवर डल्ला मारून आपले खिसे गरम करत असल्याची चर्चा आहे.

 

तालुका क्रीडा संकुल मैदानातील अवैध वृक्षतोड प्रकरणी अकोट नगर परिषदेचे संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी घटनास्थळी जावून अवैधरीत्या कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा करून संबंधित‌ विरुद्ध अकोट शहर पोलीस‌ स्टेशन ला तक्रार दाखल करत असल्याची माहिती आहे.तसेच याबाबत अकोट‌ प्रादेशिक वन‌विभागाने पंचनामा केल्याचे समजते तालुका क्रीडा संकुल मधील हिरव्या गार वृक्षांची अवैधरित्या कत्तल केल्या प्रकरणी अकोट नगर परिषद‌ व वन विभाग काय कारवाई करणार याकडे अकोट कराचे लक्ष लागले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News