युवराज डोंगरे/खल्लार
खल्लार नजिकच्या मोचर्डा येथील विद्युत सेवकाने करारनाम्यावरुन सरपंचाच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करीत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आज 4 जुलैला सकाळच्या सुमारास घडली. सरपंचाच्या तक्रारीवरुन विद्युत सेवाकाविरुध्द खल्लार ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
मोचर्डा येथील मधुसूदन पाचे हे सरपंच असुन गावातीलच अविनाश गावंडे मागिल एक वर्षापासून कंत्राटी पध्दतीने विद्युत सेवक म्हणून काम करीत होते. अविनाश गावंडेचा करारनामा संपला होता. त्याबाबतचे पत्र सरपंच मधुसूदन पाचे यांनी विद्युत सेवक अविनाश गावंडेला दिले.
आज 4 जुलैला सकाळच्या सुमारास अविनाश गावंडे हा ग्रा पं कार्यालयात आला व मला नूतनीकरण आजच करुन दया असे सरपंच यांना म्हटले यावर सरपंच मधुसूदन पाचे यांनी ग्रा पं च्या सभेत करारनामा नुतनीकरण करुन देतो असे म्हटले याच क्षुल्लक कारणावरून गावंडे हा सरपंचाच्या अंगावर धाऊन गेला व शिवीगाळ करुन मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेची तक्रार खल्लार पोलिस स्टेशनला करण्यात आली असुन खल्लार पोलिसांनी अविनाश गावंडे विरुध्द कलम 323,504,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे