अकोट: अकोट तालुक्यातील समस्त शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दव ठाकरे यांच्या सोबत असल्याची ग्वाही देत, पक्षप्रमुख मा. उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे, खा.अरविंदजी सावंत यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष कार्य निष्ठेने करण्याचा निर्धार अकोट तालुक्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांनी केला. अकोट विधानसभा संपर्क प्रमुख ऋतूकांचन रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, ३ जुलै रोजी कास्तकार भवन येथे संपन्न झालेल्या बैठकीत हा निर्धार करण्यात आला. 

आढावा बैठकीला शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला अकोट विधानसभा संपर्क प्रमुख ऋतूकांचन रसाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, युवा सेना जिल्हा संघटक राहुल कराळे, तालुका प्रमुख श्याम गावंडे, शहर प्रमुख सुनिल रंधे, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर ढोले, उपजिल्हा संघटक विक्रम जायले,जि.प.सदस्य जग्गनाथ निचळ या सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीला प्रमुख उपस्थिती जि.प. सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ, राजू मोरे, सुभाष सुरतने, सुरज गणभोज, अक्षय वाघोडे, रोशन पर्वतकर, रमेश खिरकर, गोपाल म्हैसने, कमल वर्मा, अमोल बदरखे, राहुल पाचडे, अजय लेलेकर, अक्षय घायल, जितेश चंडालिया, सागर गीते, धिरज गीते, अविनाश गावंडे, सोपान साबळे, उमेश आवारे, योगेश सुरतने, नंदू कुलट, प्रथमेश बोरोडे, अंकुश कुलट, धिरज गावंडे, प्रशांत येऊल, जयपाल ठाकूर, ऋषिकेश लोणकर, जावेद अली, पिंटू पालेकर, सचिन वानखडे, विजय जवंजाळ, योगेश बरेठीया, विशाल चौधरी, गोपाल कावरे, गजानन कौलखेडे, अभी डिक्कर, आशिष नागापूरे, चेतन कुटे, प्रथमेश बुढळकर, दिनेश बोचे, विलास चोरे, मुकेश ठोकळ, नरेश सभागचंदानी, गजानन येलकर, अरुण सोनटक्के, प्रशांत सरोदे, गणेश धारपवार, राजेश भारसाकळे, प्रफुल्ल बोरकुटे, बंडू जाधव, सुरेश शेंडोकार आदींसह पदाधिका-यांच्या उपस्थितीत स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल कराळे तर आभार प्रदर्शन विजय ढेपे यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com