सावली :(सुधाकर दुधे)
दिनांक 30/06/2022 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आझादी का अमृत महोत्सव च्या निमित्ताने पंचायत समिती, सावली अंतर्गत येणाऱ्या अंतरगाव -निमगाव प्रभागातील स्वातंत्र्य प्रभाग संघ, अंतरगाव येथील प्रभाग संघाचे वार्षिक अधिवेशन कार्यक्रम निफन्द्रा येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये प्रभागसंघाचे लेखापुस्तक, आर्थिक विवरण पत्रक व लेखापरिक्षणासाचे वाचन करण्यात आले. तसेच पुढील आर्थिक वर्षासाठी वार्षिक कृती आराखडा व अंदाजपत्रकासह वार्षिक अहवाल तयार करण्यात आला. यावेळी सन 2021-22 मध्ये झालेली प्रगती व पुढील वर्षातील वाटचाल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रभाग संघ अध्यक्ष मा.सौ. सुरेखा विजय आसमवार , कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून लाभलेले मा. श्रीमती सुनीता मरस्कोले (संवर्ग विकास अधिकारी, पं.स. सावली) सहउद्घाटक मा. श्रीमती वैशालीताई शेरकी (माजी जिल्हा प. सदस्य) प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.श्रीमती शोभा ताई आखाडे (माजी जि. प.सदस्य तथा माजी सभापती पं स,सावली )मा. श्री यशवंत पाटील बोरकुटे ( माजी सभापती, कृ. उ. स. सावली) मा.सौ उर्मिला तरारे ( माजी प. स.सदस्य), मा.श्री.पुरुषतोत्तम पाटील नवघडे (सरपंच,निफन्द्रा) मा.श्री नानाजी उंदिरवाडेे, (उपसरपंच,निफन्द्रा) मा. श्री. हरिदास पाटील बोड( पोलीस पाटील निफन्द्रा, )श्री बी के .गरमडे ग्राम सेवक,निफन्द्रा तथा सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच पंचायत समिती उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक कु.कल्पना देवाळकर ,तालुका व्यवस्थापक प्रतीक्षा गेडाम ,प्रभाग समन्वयक, श्री राजेश्वर मडावी,कु.शुभांगी धनबते ,भूषण चिलकेवार उपस्थित होते.तसेच समुह संसाधन व्यक्ती ,बँक सखी आरोग्य सखी,कृषी व पशु सखी यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाले.