युवराज डोंगरे/खल्लार

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस न पडणे ही गोष्ट आता आपल्या अंगवळणी पडली आहे.

जगभरात बिनचूक हवामान अंदाज वर्तवले जात असताना आपल्याकडेच असे का होत आहे , हा प्रश्न सामान्यांना व शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्याचे कारण संशोधनातील सातत्याचा अभाव, तसेच नवनव्या तंत्रज्ञानांच्या आधारे पाऊसमानाचा वेध घेण्याची क्षमता विकसित नकरणे अशा गोष्टींत आपण कमी पडतो आहोत. यात आता आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे.भारतीय हवामान खाते आणि त्यांच्याकडून केले जाणारे मोसमी पावसाचे भाकित हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे यावर्षी मोसमी पाऊस कोणत्या भागात कधी दाखल होणार याचा दीर्घकालीन अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही आणि अचानक मोसमी पाऊस दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली. मोसमी पावसाच्या भाकितातील या अनिश्चिततेमुळे भारतातला शेतकरी याला बळी पडत आहे , तो करत असलेली शेती आणि त्यावर अवलंबून असलेले अर्थकारण असे सारेच प्रभावित होत आहे.

दर्यापूर तालुक्यात जवळपास 50 टक्के पेरणी आटोपली आहे मात्र पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे भारतात अनेक हवामान अंदाज दर्शवणारे विभाग आहेत मात्र अचूकपणे अंदाज 

नदर्शवल्याने याचा परिणाम शेतकरी वर्गावर होत आहे आणखी महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला नसून त्या विषयी हवामान खात्याने आपली भूमिका मांडावी व शेतकरी हिताचेच अंदाज वर्तविण्यात यावे त्या अंदाजावर संपूर्ण शेतकरी आपलं नियोजन आखत असतो हवामान खात्याने आपल्या अंदाजमध्ये नाविन्यता आणणे गरजेचे आहे केवळ बी बियाणे खते कीटकनाशके या कंपनीच्या हितासाठी आपले अंदाज व्यक्त करणे बंद करावे असे सुधाकर पाटील भारसाकळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com