सावली ( सुधाकर दुधे )
पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत हिरापूर ग्रामपंचायत ने मौजा हिरापुर येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 1 व 2 आणि मौजा केशरवाही येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 18 ला साहित्य वितरण करण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायत हिरापूरने अंगणवाडीला गॅस सिलेंडर, भांडे ,ड्रम, दिलीत त्यासोबतच लहान मुलांना रुमाल देण्यात आली
अंगणवाडी येथील शिक्षिकेने
ग्रामपंचायत ला लागणारी वस्तूची यादी सादर केली होती त्यानुसार 15 व्या वित्त आयोगात तरतूद करण्यात आली होती आज त्याची पूर्तता करण्यात आली मागील वर्षी सुध्दा अंगणवाडी केंद्राला अनेक वस्तूचा ग्रामपंचायत ने पुरवठा केला होता
भविष्यात अजून पुन्हा सामान, साहित्य अंगणवाडीला व शाळेला देण्यात येतील असे गावाच्या प्रथम नागरिक सौ प्रीती नितीन गोहणे यांनी याप्रसंगी सांगितल्या
सदर साहित्य वितारण सरपंच प्रीती गोहणे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी गावचे उपसरपंच शरद कंनाके, ग्रामपंचायत सदस्य वामन भोपये, सरिता भोयर, प्रमोद भोपये, नीता मुंघाटे,माधुरी आत्राम, ग्रामसेवक ठामदेव शेडमाके, अंगणवाडी शिक्षिका सुनीता काडबांधे,मंगला मडावी, सौ चौधरी याप्रसंगी उपस्थित होत्या