चिमूर स्केटिंग अकॅडमीने पटकाविले 3 पदकं…

      रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

        दि.२/६/२४ नागपूर येथे इंडियन स्केटिंग अकॅडमीच्या वतीने स्केटरेसर्स इंडिया ओपन रोलर स्केटिंग चैपीयनशीप NMC स्केटिंग रिंक नंदनवन नागपूर येथे स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

        स्केटिंग स्पर्धेत नागपूर, उमरेड, चिमूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, अचलपूर, संभाजीनगर, नाशिक येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत चिमूरच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करीत ३ पदके पटकावलीत. त्यात २ रौप्य पदक व १ कास्यपदकांचा समावेश आहे. 

       Vb8 ते 10 वयोगटातील हृदयांश उमेश काटेकर याने रौप्यं पदक पटकाविले. तसेच १४ वर्षवरील वयोगटातील स्वर्णीका श्रीकांत मार्गोनवार हिने रौप्य पदक पटकाविले. 6 – 8 वयोगटातील पीहल प्रशांत सूर्यवंशी हिने कास्यं पदकं पटकाविले.

          10 ते 12 वयोगटातील अनुष श्रीकांत मार्गोनवार व ४-६ वयोगटातील रिध्दीशा उमेश काटेकर यांनी छान प्रयत्न केलेत. सर्व विजेते स्केटर्स चिमूर स्केटिंग अकॅडमी चिमूरचे नियमित खेळाडू आहेत.

             सर्व खेळाडू आपल्या सफलतेच श्रेय आपल्या आई-वडिलांना तसेच कोच सौ रोशनी उमेश काटेकर यांना देत आहेत. स्केटिंग अकॅडमी चिमूर चे व सर्व विजयी खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे सर्व पालकांकडून तसेच चिमूरवासीयांकडून अभिनंदन केल्या जात आहेत.