ते भाजपा सोबत गेले होते… — चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकातंर्गत झालेल्या घडामोडी अविश्वसनीय… — एकदाचे पुढे येवू द्या!

 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

            चंद्रपूर जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणूका आताच पार पडल्या,यात काँग्रेसने ४ बाजार समित्यांवर विजय संपादन केला.परंतु निवडणुका नंतर काँग्रेसची गटबाजी अकालनीय उफाळून समोर आली असल्याचे आता पुढे आले आहे.

       चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकातंर्गत काँग्रेसच्या एका गटाची भाजपा सोबत झालेली छुपी युती जनमानसात चर्चेचा विषय बनली होती.

            जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा सहकार नेते संजय डोंगरे यांनी भाजपा आमदार बंटी भांगडीया सोबत हात मिळवणी करून काँग्रेसला चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेपासून दूर केले याचे शल्य अनेकांना आहे.

            कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकातंर्गत झालेली अभद्र युती येणाऱ्या चिमूर विधानसभा निवडणुकीत कोणाच्या पथ्यावर पडेल हे सांगणे कठीण आहे.तद्वतच सदर युतीचे गुपिते आरोपपत्यारोपात चव्हाट्यावर पुढे चालून येणारच आहेत.

            चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संजय डोंगरे यांनी आमदार बंटी भांगडिया यांच्या पॅनल सोबत केलेली युती कोणाच्या सुचने वरून केली,”की, ते स्वतः निर्णयातंर्गत युतीसाठी समोर आले हे वास्तव सध्यातरी लपून आहे.

       मात्र,चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या पॅनलचा झालेला दारुन पराभव महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचविणारा आहे हे नाकारता येत नाही.

           संजय डोंगरे हे स्वयंमी,शांत,अनुभवी व मुरब्बी राजकारणी आहेत.ते माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत असीच त्यांची अजूनही जनमानसात प्रतिमा आहे.

       पण,सोशल मीडियावर आज वायरल झालेला संदेश सांगतो की ते माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीष वारजूकर यांचे खंदे समर्थक आहेत.

         जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे हे कुणाचे समर्थक आहेत आणि कुणाच्या जवळचे आहेत ते एकदाचे पुढे आलेले बरे!

            टांग मारण्यापेक्षा,मुसद्देगिरिने टांग लटकवून पाडणे आणि हरवने हा पहिलवानांचा कुस्ती खेळ आहे.मात्र अलिकडच्या काळात राजकारण्यांनी न पाडताच हरविण्याचा नवा खेळ सुरु केला आहे.आणि त्या खेळाचे नाव आहे वेळेनुसार “जिरवने,…

      मात्र अशा कुचपटीच्या राजकारणात समाजमन ढवळून निघते व वैचारिक दृष्ट्या भ्रमिष्ट होते त्याचे काय?