खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते सिरोंचा ते रेपनपल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन उद्याला..  – या भूमिपूजन समारंभाला माजी राज्यमंत्री तथा नवनिर्वाचित भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य राजे अमरीशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती. 

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

      खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महामार्ग एन एच -३५३,सिरोंचा ते रेपनपल्ली विभागातील ५९ किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन समारंभ उद्या ५ मे ला दुपारी १२.०० वा. सिरोंचा येथे संपन्न होत आहे.

       भुमीपुजन कार्यक्रमाप्रसंगी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक,यांनी मोठ्या संख्येने रहावे असे आवाहन गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या सह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.