
ऋषी सहारे
संपादक
धानोरा :- पंचायत समिती धानोरा येथील शिक्षण विभागाला भेट दिली असता येथील कर्मचाऱ्यांना पुरेशा सोयी अभावी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कार्यालयामध्ये पुरेशा सोयी सुविधा नाही, कार्यालयीन कर्मचारी पुरेसा नाही.
दोन वरिष्ठ लिपिकांची त्या ठिकाणी आवशकता आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून ही दोन्ही पदे रिक्त आहेत. ज्यांना तिथे तात्पुरत्या प्रतिनियुक्तीवर दिले आहे ते अन्य कामामुळे या विभागात लक्ष् देऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांना अपुऱ्या जागेमध्ये कोठडीत बसावे लागते. याठिकाणी अनेक शिक्षक कामानिमित्ताने येतात. त्यांना बसण्यासाठी जागा नाही.
कडक उन्हाळा असूनही फॅन नाही, कुलर नाही. कर्मचाऱ्याला मजबुरीने स्वतःचा पंखा लावून बसून काम करावे लागत आहे. ही शोकांतिका आहे. या बाबत विभाग प्रमुख म्हणून कार्यालसायला सोयी सुविधा पूर्वीण्याबाबत संबंधित कर्मचारी व गटशिक्षणाधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांचेकडे वारंवार मागणी केली, ही बाब लक्षात आणुन दिली.
परंतु पंचायत समिती गट विकास अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असे दिसून आले. पंचायत समिती स्तरावरील या अडचणीकडे ज़िल्हा परिषद प्रशासनाने सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.
शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या या गैरसोयईकडे संबंधित अधिकारी यांनी त्वरित सुधारणा घडवून आणावी अन्यथा आजाद समाज पार्टी पंचायत समिती कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.