युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
खल्लार पोलीस स्टेशन खल्लार अंतर्गत अवैध धंद्याविरोधात मोहीम राबवण्यात आली असून खल्लार पोलीस ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द पेट्रोलिंग करीत कारवाई करणे सुरु केले आहे.
यामुळे खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.खल्लार पोलिस स्टेशनची हद्द हि सर्वात जास्त आहे.६५ गावे खल्लार पोलिस स्टेशनमध्ये समाविष्ट असून यात चार बिटचा समावेश आहे.खल्लार पोलिस स्टेशनमध्ये ठाणेदार मेसरे या एकच अधिकारी असून महिला ठाणेदार असलेल्या चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली खल्लार पोलिस स्टेशनचे कर्मचारी अवैध धंद्याविरुध्दच्या मोहिमेत योग्य कर्तव्य पार पाडीत आहेत.