सेंट फ्रांसेस टी.एस.के. इंग्लिश मिडयम स्कूल येथील खेळाडू शालेय विभागीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत रजत पदक प्राप्त…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

           महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या वतीने विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपुर जिल्हा वर्धा येथे दिनांक ३० डिसेम्बर २०२३ रोजी संपन्न झालेल्या नागपुर विभागीय स्तरीय शालेय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत १४ वर्षीय आतील या वयोगटात अमय पवण रोडे या खेळाडूने -६५ किलो व १७ वर्षीय आतील या वयोगटात जतिन सचिन सातपुते या खेळाडूने -५५ किलो वजन गटात सेंट फ्रांसेस टी. एस. के. इंग्लिश मिडयम स्कूल चे प्रतिनिधित्व करीत रजत पदक प्राप्त केले.

          या खेळाडूचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. सदर खेळाडूला प्रशिक्षक म्हणून शाळेतील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख ईखलाक रसुल खा पठान व मार्गदर्शक म्हणून प्रदीप शंकर गेडाम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

          नागपुर विभागीय शालेय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू हे समुद्रपुर वर्धा येथून शाळेत परतल्या नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मर्सी फ्रांसिस कुमार यांच्यासह सर्व सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यानी खेळाडूंचे अभिनंदन केले.

           तसेच या खेळाडूच्या यशाबद्दल सेंट फ्रांसेस टी.एस.के. इंग्लिस स्कूल चंद्रपुर येथील मुख्याधापिका मर्सी फ्रांसिस कुमार शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख ईखलाख रसूल खा पठान, सहाय्यक शारीरिक शिक्षण प्रदीप गेडाम स्पोर्टीव संस्थेचे सचिव संदीप गुड़ीमुल्ला तसेच शाळाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुध्दा खेळाडूचे कौतुक करून अभिनंदन केले .