पळसगाव (पिपर्डा) नदीघाटावरील रेती चोरीचा गंभीर प्रकार: एक धक्कादायक वास्तव… — भुजल पातळी कमी होण्याची शक्यता,पर्यावरणावरही परिणाम..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी..

     चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगाव (पिपर्डा) नदी घाटावरून सुरू असलेली अवैध वाळू चोरी हा एक गंभीर प्रकार असून वाळू चोरी सामाजिक उन्नतीला तडा देणारी ठरली आहे आणि वाळू चोरीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळणारा प्रकार आवर्जून उपस्थित झाला आहे. 

        स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या वाळू चोरी प्रकरणाकडे केलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे.रात्रोच्या अंधारात रेतीची तस्करी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरु आहे.मात्र,संबंधित प्रशासन शांतपणे झोपा काढताना दिसत आहे.

         अवैध रेती चोरीमुळे नदीपात्रातील असंतुलन पणामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवन्याची शक्यता असून याचे दुष्परिणाम पुढे येण्याची चिन्हे आहेत.

          याचबरोबर वाळू चोरीमुळे नदीपात्रातील पाणी आटू लागल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फटका बसन्याचा संभव नाकारता येत नाही.

          वाळू चोरीला अनुसरून महसूल विभागाचे नियंत्रण पूर्णपणे ढिसाळ झाले असून,या प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याची बाब वारंवार पुढे येत आहे.

        स्थानिक ग्रामस्थांनी वाळू चोरी प्रकरणाला अनुसरून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून,या अवैध वाळू चोरी व्यवसायाला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. 

         तद्वतच संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वाळू चोरी प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

         पळसगाव (पिपर्डा) येथील नदीघाटावरील अवैध रेती चोरीमुळे परिसरातील पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत आहे.नदीच्या पाणी पातळीवर याचा विपरीत परिणाम होत असून,भूजल पातळी लोप होत आहे.

         प्रशासकीय यंत्रणेने वाळू चोरी प्रकरणी तातडीने दखल घेऊन ठोस कारवाई करणे आवश्यक आहे.