बेलोरा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

युवराज डोंगरे /खल्लार 

          उपसंपादक

          खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील बेलोरा येथिल 27 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 3 फेब्रुवारी घडली.

        अंकुश श्रीकृष्ण निंबाळकर (27)असे गळफास घेणाऱ्या युवकाचे नाव असून त्याच्या वडिलांच्या नावाने अडीच एकर शेत आहे. अंकुश हा शेतातील मोलमजुरीचे काम करीत होता.त्याने फायनान्सवर ट्रॅक्टर घेतला होता. मात्र त्याचे हप्ते वेळेवर भरू न शकल्याने फायनांस वाल्यांनी ट्रॅक्टर ओढत नेला. 

        काल सायंकाळी पाच ते साडे पाच वाजताच्या सुमारास घराच्या बाजूलाच असलेल्या गोठ्यात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

           घटनेची माहीती पोलिस पाटील सौ.जोत्सना राजेश भारसाकळे यांनी खल्लार पोलिसांनी दिली.खल्लारचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र बारड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ किशोर घुगे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपाससाठी उपजिल्हारुग्णालय, दर्यापूर येथे पाठविला.

        मृतकाच्या मागे आई, वडील, दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.