व्यवस्थेच्या (नॉन बायलॉजिकल प्राणी आणि तडीपाराच्या) गुलाम झालेल्या अंधधर्म भक्त……..

व्यवस्थेच्या (नॉन बायलॉजिकल प्राणी आणि तडीपाराच्या) गुलाम झालेल्या अंधधर्म भक्त……..

 अच्छे दिनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांनो……

 उघडा डोळे ( हृदयाचे ) बघा नीट )…….!

        2013/ 14 च्या अर्थसंकल्पीय वर्षात केंद्रसरकारवर अर्थात देशावर 31 66173•80( एकतीस लाख सहासष्ट हजार एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये ) कोटी रुपयाचे कर्ज होते.

  तेंव्हा त्या कर्जाचे केवळ व्याज हे 333281•45 कोटी (तीन लाख तेहतीस हजार दोनशे एक्यांशी कोटी रुपये) रुपये देण्यात आले.

     आणि उत्पन्न केवळ 1851563•63 सुमारे ( अठरा लाख एक्कावन हजार पाचशे त्रेसष्ट कोटी रुपये ) कोटी रुपये होते…..!

     म्हणजेच 2013/ 14 च्या वर्षात एकूण दरडोई कर्ज 27, 773 • 45 रुपयाचे ( सत्तावीस हजार सातशे त्र्याहात्तर रुपयाचे कर्ज ) कर्ज होते.याचा अर्थ प्रत्येक भारतीय नागरिकावर एवढे कर्ज होते.

      आणि आज 2 फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार……….

 देशावर एकूण कर्जाची आकडेवारी ही 205 लाख कोटी रुपये आहे…..!

     त्या कर्जाच्या व्याजापोटी 1703025 ( सतरा लाख तीन हजार पंचवीस कोटी रुपये ) देण्याची व्यवस्था करावी लागली……..!

     पुन्हा याच वर्षात कर्ज घेऊन 85, 15 125 कोटी रुपयाचे (पंच्यांशी लाख पंधरा हजार एकशे पंचवीस कोटी रुपये )उत्पन्न दाखवावे लागले (यामध्ये पुन्हा 20, 43630 कोटी रुपयाचे नव्याने कर्ज घ्यावे लागले ). म्हणजेच या चालू आर्थिक वर्षाचे देशाचे एकूण उत्पन्न केवळ 6471495 ( चौसष्ट लाख एकाहत्तर हजार चारशे पंचान्नव कोटी रुपये) कोटी रुपये आहे.

       म्हणजेच 2025 च्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकावर 141428 •00 हजार रुपयाचे (एक लाख एकेचाळीस हजार चारशेअठावीस रुपयाचे कर्ज झाले आहे)कर्ज आहे…..!!!

     म्हणजे थोडक्यात सारांशरूपाने सांगावायचे झाल्यास 2013 / 14 या वर्षात प्रत्येक भारतीय नागरिकाच्या डोक्यावर 27, 773 • 45 ( सत्तावीस हजार सातशे त्र्याहत्तर रुपये पंचेचाळीस रुपयाचे कर्ज होते)कर्ज होते.

     तेच कर्ज वाढत जाऊन आज 2025 च्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकाच्या डोक्यावर 141428•00( एक लाख एकेचाळीस हजार चारशे अठ्ठावीस रुपये ) झाले आहे……!!!!!

    याला जबाबदार कोण….?

    याला जबाबदार केवळ आणि केवळ अनंत भवरेच आहे…..!!”

            कारण……..

 त्याने EVM ला विरोध केला नाही…….

      त्याने राजकारण्यांपुढे क्षुल्लक आणि फुटकळ स्वार्थासाठी लोटांगण घातले………..

 त्याने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले…….

  तो शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी होऊन आत्महत्या होण्याला तो कारणीभूत झाला………

       त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला ते एका विशिष्ट समाजाला आरक्षण दिल्यामुळे कधी पान उघडून पाहण्याचा प्रयत्न कधी केलाच नाही………

        विशेष म्हणजे त्याने देश, लोकशाही, संविधान यापेक्षा आपल्या धर्माचा कोरडा अहंकार जोपासल्यामुळे तो विज्ञानवादी कधी होऊ शकला नाही, त्यामुळे तो विवेकवादी बनलाच नाही. म्हणून तो मानवता धर्माचा अनुयायी होऊन कधी “माणूस ” बनलाच नाही……….

       त्याने इकडून तिकडे, तिकडून इकडे हातात झेंडे घेऊन मिरवत राहिला………

       स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाकडे( माणूस बनण्याच्या शिक्षणाकडे ) दुर्लक्ष करत त्यांच्याही हातात झेंडे, बाटल्या आणि बोट्या बघून गर्वाने ऊर भरून आला……..

       म्हणून कूटनितीच्या सर्वच राजकीय नेत्यांनी अनंत भवरेच्या मानसिकतेचा लाभ उठवत त्याच्या डोक्यावर आज 1, 46 428 ( एक लाख छेचाळीस हजार चारशे अठ्ठावीस रुपयाचे कर्ज ) रूपयाचे कर्ज ठेवले……..!

      असाच कर्जाचा डोंगर वाढत गेला तर आमचा देश लवकरच पाकिस्तान, श्रीलंका यांच्या रांगेत जाईल……….!!!””

          त्यासाठी एकच उपाय…….

    संविधान जागृती देशाची प्रगती

         यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचे कर्ज वेगळेच आहे……..!!!!

संविधान जागृतीचा आवाहनकर्ता आणि लेखक

         अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689