कोणत्याही व्यक्तीचे देव, देश,धर्म, गाव या चार गोष्टीवर प्रेम असते.शिवाय निष्ठा पण असते.प्रेम,निष्ठा, भक्ती या मनाशी तसेच बुद्धिशी पण संबंधित आहेत.कारण प्रेम,निष्ठा, भक्ती या मानसिक तसेच बौद्धिक विषय आहेत.मानसिक यासाठी आहेत की,त्या मनाशी संबंधित आहेत,म्हणून या गोष्टी भावनिक आहेत,तसेच या गोष्टी विचार म्हणून पण स्वीकारता येतात,कारण या तिन्ही गोष्टी बुद्दिशी पण संबंधित आहेत.
देव गाव देश धर्म या गोष्टी जशा भावनिक आणि विचारिक आहेत ,तशाच नैतिक पण आहेत,याचा अर्थ त्या नितीत बसतात,निती ही गोष्ट अशी आहे की,ती विचार आणि भावनेच्या पलीकडची आहे,बलवान शक्तिमान आहे.म्हणून हे सारे जग नितीतत्वावर चालते.न्याय अन्याय,सत्य असत्य,योग्य अयोग्य,चूक बरोबर ठरवण्याची वेळ येते,तेंव्हा नितीचीच कसोटी लावल्या जाते,ते नितित्त बसले तरच ती गोष्ट पास होते,नाहीतर नापास बेकार आऊट ठरते,बिन कामीं होते.
निती ही भावनेने विचाराने म्हणजेच मानसिकता आणि बुध्दीने ठरवायची नसते,तर ती प्रज्ञा बुध्दी आणि विवेक बुध्दीने ठरवायची असते.निती कशाला म्हणतात ? ते माणसाची सारासार म्हणजे न्याय बुध्दी ठरवीत असते.या सारासार न्याय बुद्दीलाच प्रज्ञा विवेक बुध्दी म्हणतात.जी सर्वांकडे असते,पण तिचा वापर केल्या जात नाही.व्यवहारात या विवेकबुद्धी च जर साऱ्यांनीच वापर केला तर सारे जग हे नीतिमत्ता वर चालले असते.पण सामान्यतः लोक नीतीने चालताना दिसत नाहीत,याचे कारण ते भावना विचार याचाच आधार घेतात,नीतीचा म्हणजेच विवेक प्रज्ज्ञाबुद्दी,सारासार न्यायबुद्दीचा वापर करीत नाहीत.सत्य न्याय निती,दया,क्षमा,शांती,माणुसकी,प्रेम,बंदिभाव,स्वातंत्र्य,समता या नैतिक मूल्यांच वापर व्यवहारात करीत नाहीत,म्हणूनच तर संसार जीवन गुंतागुंतीचे,अडचणीचे,समस्यांचे,दुःखाचे होऊन बसते.विकृती कार्यरत होते.दुर्गुण कार्य करायला लागतात.सद्गुण मागे पडतात.म्हणून तर जगात दुःखच दुःख आहे.
देव देश धर्म या विषयाच्या बाबतीत पण असेच घडताना दिसते आहे.देव आणि धर्म ही आपली खाजगी बाब आहे.तिला सार्वजनिक व राजकीय सामाजिक करता कामा नये.कारण देव आणि धर्म या गोष्टी कदाचित मनाला शांती देणाऱ्या गोष्टी असतील तर त्यांना मनाशी भवणेशीच संबंधित ,मर्यादित ठेवले पाहिजे,त्यास कौटोंबीक पण करता काम नये.कारण हे दोन विषय वैयक्तिक खाजगी आहेत,याचा अर्थ ज्याचा त्याचा विचार मनाशी संबंधित आहेत.व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हा निसर्गनियमानुसार प्रत्येकाची प्रकृती तब्येत विचार मन सारखे नसते,प्रवृत्ती प्रकृती स्वभाव सारखे नसतात,अगदी एका कुटुंबातील व्यक्ती सुध्धा सारख्या नसतात.म्हणून देव धर्म कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा ऐच्छिक विषय व्हायला पाहिजे.सक्तीचा विषय होऊ नये.यातच सर्वांचे भले आहे.सुख आहे.आनंद आहे,शांती समाधान आहे.अन्यथा देव आणि धर्माची सक्ती जबरदस्ती झाली की मग झाले,सारा खेळ खलास,अहंकार,द्वेष,मोह,मांन माया लोभ,या साऱ्या विकृतीला संधी मिळते.त्यातून हिंसेला वाव मिळतो.एकदा का हिंसा भडकली की मग साऱ्या जाती धर्माच्या ,साऱ्या विचारांच्या सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवणारा घटक म्हणजे गाव आणि देश छिन्न विच्छिन्न होईल.देशातील लोकांत समरसता,एकता,ऐक्य,बंधुभाव,प्रेम,सलोखा,धर्मनिरपेक्षता,समानता,समानता राहणार नाही.प्रत्येक धर्म दुसऱ्या धर्माकडे,प्रत्येक जात दुसऱ्या जतिकडे,प्रत्येक देश दुसऱ्या देशाकडे शत्रू म्हणूनच पाहिलं.प्रत्येक व्यक्ती एकमेकांचे दुश्मन बनून सख्खे भाऊ पक्के वैरी होतील.
खरे तर जो ज्या देशात राहतो,तो,स्वतःचे श्रम ,कष्ट,मेहनत,वेळ,पैसा,संपती कौशल्य,सारा जीव देशनिर्मान साठी लावीत असतो,मग तो कोणत्याही जाती धर्माचा देशाचा असो.जो जिथे ज्या देशात गावात राहतो,त्या गावचा देशाचा नागरिक असतो,मालक असतो.ही नैतिकता म्हणजेच मानवी मूल्य होय.त्याचे ज्या देशात ,ज्या गावात पोट भरेल,ज्या देशात गावात,शहरात त्यास रोजगार मिळेल ,तेथेच तो राहील,म्हणून राहील त्याचे घर,आणि कसेल त्याची जमीन,हा निसर्गाचा न्याय होय,निसर्ग नियम होय.कारण सब भूमी गोपलकी,विश्वाची हे माझे घर,विश्व बंधुत्व , विश्व धर्म हीच खरी निती होय.व्यापक विचार,व्यापक भावना,संकुचित विचार भावना पेक्षा कधीही श्रेष्ठच असतात.ठरतात. म्हणून माझा देव,तुझा देव,माझा देश तुझा देश,माझा धर्म तुझा धर्म,असे माझे तुझे म्हणजे संकुचित आणि स्वार्थी विचार भावना आहेत.या नैतिकतेत बसत नाहीत.म्हणून माझं माझं गाढव ओझं घेऊन माणसाने सारे आयुष्य बरबाद का करायचे ? हा धर्म माझा.हा देश माझ्याच धर्माचा,आमची संख्या जास्त म्हणून हा देश आमच्याच धर्माचा,असे म्हणणे हे चुकीचे,संकुचित,स्वार्थ पणाचे,असत्य गोष्ट आहे.अनैतिक आहे.दोन मानव समूहात भांडणे लावणारी व राजकीय आपली पोळी भाजून घेणारी दुष्ट गोष्ट आहे.अनैतिक आणि पशुतुल्या आहे.मानवीय नाही.म्हणून हिंदू राष्ट्र,खलिस्तान,मुस्लिम स्थान,दलितस्थान,बोडॉस्थान,तामिळी टायगर,या मागण्या देशविघातक,देशद्रोही आणि असंविधानिक आहेत,यांचेवर कायदेशीर कारवाही करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते.पण खुंटी नेच हार गिळला,किंवा कुंपणानेच शेत खाल्ले तर काय करायचे ? तर ती खूटी उपडून फेकायची आणि ते कुंपण काढून टाकायचे हे मतदाराचे मतदार राजा,मतदार मालकाचे काम आहे.पण तो जागृत असेल तरच हे शक्य आहे.नाही तर या देशात लवकरच लोकशाही संपून हुकुमशाही आणि सामाजिक लोकशाही ऐवजी धार्मिक सत्ता ,धर्मांधांचे राज्य,पुजारी ,धर्म मार्तंड यांची हुकुमशाही येणार.याचेच पाहिले पाऊल म्हणून प्रयाग येथील कुंभमेळ्यात सर्व साधूंनी ( कामसाधू राजकारण्यांच्या इशाऱ्यावर ) भारताचे अखंड हिंदुराष्ट्र चे संविधान तयार करून ते हिंदू समाजापुढे ठेवले आहे.आता ते सरकारपुढे पण ठेवणार आहेत.सरकार पण धर्मांधाच आहे.याचा अर्थ आपल्या एकसंघ अखंड देशाची वाट लागणार.देशात अराजक माजनार.सर्व धर्माचे लोक आपापले वेगळे राष्ट्र मागणार,आणि देशाचे इंग्रज येण्या आधी जेव्हढे तुकडे होते ,तेव्हढे परत होणार.650 संस्थानिक पण आपापले राज्य मागणार.हे हिंदुराष्ट्र ची मागणी करणाऱ्यांच्या दिमाखात कसे येत नाही ?
खरे तर हा देश जनतेचा कधीच नव्हता,हा हुकूमशहा राज्यांचा होता,मग तो हुकूमशहा कधी हिंदू ,कधी मुस्लिम,कधी इंग्रज असेल,पण लोकशाही लोकसत्ता या देशात कधीच नव्हती.ती 15 ऑगस्ट 1947 ले देश स्वतंत्र झाला.म्हणजे या देशातील जनता गुलामीतून मुक्त झाली.या देशाची मालक झाली.स्वातंत्र्य लढ्यात कोण होते ? सर्वच जाती धर्माचे अर्थात त्यात ख्रिचन मुस्लिम पण होते,हिंदू पण होते.पण आज सत्तेवर असलेले आर एस एस बिजेपी चे लोक स्वातंत्र्य संग्रामात नव्हते.सुरुवातीस असले तरी नंतर रांसंग्रमातून माघार घेतली,आणि उलट स्वातंत्र्य सैनिक विरोधी भूमिका घेऊन इंग्रजांना मदत केली. अशांना सत्तेत राहण्याचा पण नैतिक अधिकार नाही.तरी हेच लोक हिंदू राष्ट्राची मागणी करीत आहेत.काँग्रेस व इतर पक्षाचे हिंदू लोक ही मागणी करीत नाहीत.उलट सर्वांचेच म्हणणे आहे की,स्वातंत्र्याची लढाई सर्वच जाती धर्मियांनी करून हा देश सर्वांनीच जिंकला.इंग्रजां कडून घेतला.म्हणून हा देश सर्वच धर्मीयांचा आहे.भेदभाव करता काम नये.अराजक माजाऊ नये.देशाचे ऐक्य वअखंडता भंग करू नये.पण गोरगरीब लाचार अज्ञान धर्मांध व धर्मभोल्या हिंदू मतदारांना मूर्ख बानाऊन,त्यांना पैशाचे आमिष देऊन,फुकट धान्य,लाडकी बहिण,अशा योजना काढून ,evm मतदान यंत्रात घोटाळा करून हे समाज द्रोही ,देशविघातक ,लोक संविधानाचे पालन न करता प्रांतिक सरकारांची तोडमोड करून,आमदार खासदारांना विकत घेऊन,त्यांना इडी इन्कम टॅक्स ची भीती दाखून म्हणजेच वाम मार्गाने म्हणजेच अनितीचा वापर करून अनेक दुष्ट निती ,दुष्ट चाली,कूटनीती ,कपट कारस्थान करून,साधुसंत यांना बिघडून सत्तेत परत परत येत आहेत हे धर्मांध लोक.हा भारतास फार मोठा धोका आहे.
यासाठी अज्ञान अडाणी जनतेकडून यातून मुक्तीची अपेक्षा करता येत नाही,पण शिकले सावरलेले,विचारवंत,पत्रकार,साहित्यिक,कलाकार,कार्यकर्ते यांचे कर्तव्य ठरते की आपण या धार्मिक संकटात अडकलो आहोत.यातच आपले मरण आहे.ते चूक वायचे कसे ? यावर आताच विचार करणे गरजेचे आहे.अन्यथा 1935 ले हिंदुराष्ट्र ची घोषणा होणार,आणि देशात अराजक माजणार, लाखो कर्डो लोकांचा संहार होणार.त्यात मुस्लिम ,ख्रिश्चन शीख पेक्षा जास्तीत जास्त हिंदूंचं मरणार आहेत.फाळणीच्या वेळी जसे रक्ताचे पाट वाहले तसेच परत या देशात रक्ताचे पाट वाहतील.निष्पन्न काय ? तर एका देशाचे अनेक दुकडे होणार.आणि अखंड भारताचे आर एस एस चे पण स्वप्न धुळीस मिळणार.शेवटी शून्यातून शून्यात च.आहे तेही गमावले.असेच घडेल.म्हणून आर एस एस.बीजेपी यांनी स्वार्थ सोडून आम् भारतीयांचे हित जोपासले पाहिजे.वादी साठी हल्ल्या कापू नये. उंटासाठी दरवाजा पाडू नये,हीच आमची तळमळ.