विद्यार्थ्यांमध्ये कलाकौशल्य असेल तर नक्कीच कौतुक होईल :- अरविंद आत्राम… — शाळांमध्ये स्नेहसंम्मेलनाचे आयोजन काळाची गरज…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       आज जग आधुनिकतेच्या प्रवाहात वाहत चालले आहे. मोबाईल, कॅम्युटर, इंटरनेटच्या या युगात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण जगापुढे आणण्यासाठी शाळांमध्ये स्नेहसंम्मेलनाचे आयोजन होने ही काळाची गरज आहे.त्यातुनच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण सामोर येथील असे वक्तव्य कार्यक्रमाचे मार्गदर्शक अरविंद आत्राम यांनी केले.

        चिमूर तालुक्यातील वडसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय सांस्कुतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

        यावेळी मंचावर सरपंच अन्नपूर्णा मादाडे, उपसरपंच वनिता रामटेके, ग्राम पंचायत सदस्या रिनाताई पाटील, ग्रामसेविका मिनाक्षी बोंढेकर,प्रेमिला जांभूळे, अरविंद आत्राम, विवेक रामटेके, धनराज मेश्राम, पोलिस पाटील दामुधर गेडाम, नितीन पाटील, देवराव चांदेकर,संघानद रामटेके,अजय चांदेकर,हरीचद्र मादाडे,हरीचद्र आत्राम, किशोर श्रिरामे, मुख्याध्यापिका डॉ.लता मेश्राम,कुभरे,बारेरकर, संतोष,जाभुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

        ते पुढे म्हणाले की आजचे विद्यार्थी शाळा संपली की घरी जाताचं मोबाईल हातात घेतात. आजच्या काळात आपल्या जिवणात मोबाईल हा अविभाज्य घटक झालेला आहे. परंतु पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासुन दुर ठेवून पुस्तकामधुन अभ्यास करण्यास प्रवृत्त केले पाहीजे.मोबाईल मुळे विद्यार्थ्यांची वाचन करण्याची वृत्ती हरपत चालली आहे पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये असे मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाची सुरवात माता सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून करण्यात आली. 

          कार्यक्रमांचे प्रास्ताविक डॉ.लता मेश्राम यांनी केले तर संचालन मानकर मॅडम यांनी मानले.