महादवाड़ी येथे तंमुसच्या सहकार्याने पकडले अवैध दारु…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

         चिमूर तालुकातंर्गत मौजा महादवाड़ी येथे अवैध दारू येत असलेल्या दुचाकी स्वाराचा तंमुस अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी दारू तस्कराचा दुचाकीने पाठलाग करून पकडली.

         सवीस्तर वृत्त असे आहे की,गुप्त माहीतीच्या आधारे १ फेब्रुवारीला रोजी सकाळी आठ वाजता नवरगांव वरून १ ते २ पेट्या दारू येत असल्याची माहीती मिळाली.

      त्याच आधारे महादवाड़ी तंमुस अध्यक्ष अमोल भागडे यांनी अवैध विक्रेत्यावर नजर ठेवून रवींद्र रामटेके यांची वय ४० वर्ष व अनुश रामटेके वय २० वर्ष एम.एच.३१.७०१७ या क्रमांकाच्या दुचाकीचा पाठलाग करून शेतात देशी दारूची पेटी पकडली. पण अवैध दारू विक्रेते फरार झाले.

        ११२ वर पोलीसांना माहीती दीली लगेच चिमूरचे पोलीस उपनिरीक्षक दत्ताहरी जाधव व पोलीस भरत घोडवे यांनी महादवाड़ी येथे जाऊन एकुण ९८ नग ९० मीलीची रॉकेट देशी दारू अंदाजे किंमत ३४३० मुद्देमाल जप्त केली रवींद्र केवळराम रामटेके व अनुश रामटेके यांच्यावर कलम ६५ मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        यात महादवाडी चे सरपंच भोजराज कामडी यांनी ही प्लॅनिंग तंमुस अध्यक्ष सोबत होती.